
सिंधुदुर्गनगरी : गोवंशीय जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. २४० गावातील २९८ जनावरे या आजाराने बाधीत झाली असून यातील २१० जनावरे औषधोपचार अंती बरी झाली आहेत सस्थस्थिती ८८ जनावरे उपचाराखाली आहेत. २ वासरांचा मृत्यू झाला आहे. हा आजार बरा होणारा असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. जनावरांना काही लक्षणे दिसल्यास पशू दवाखान्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
गोवंशीय जनावरांना होणाऱ्या लंपी आजारावर आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ सुधाकर ठाकूर उपस्थित होते. यावेळी लंपी आजार हा गोवंशीय जनावरांना होतो. आपल्याकडे २०२२-२३ पासून या आजाराने जनावरे त्रस्त झाली होती. यावेळी ४ हजार जनावरे बाधित झाली होती. तर १२७ जनावरे दगावली होती. २०२३-२४ मध्ये ४५०० जनावरे बाधित झाली होती तर १२३ जनावरे दगावली होती. हा आजार साधारणतः सप्टेंबर मध्ये जनावरांना होतो. मात्र यावेळी पाऊस लवकर आल्याने या आजाराचा प्रादुर्भाव जुलै महिन्यातच दिसून येत आहे.
जिल्ह्यात सध्या ७२ हजार ६०० गोवंशीय जनावरे आहेत. त्यांच्यासाठी ७२,६०० लंपी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली होती. ही लस लहान.वासरे सोडून मोठ्या जनावरांना दिली जाते. त्यानुसार ६९ हजार ३१२ जनावरांना लस देण्यात आली आहे. तरीही २४० गावातील गोवंशीय जनावरे लंपी आजाराने बाधीत झाली आहे. २९८ जनावरे या आजाराने बाधीत झाली असून यातील २१० जनावरे औषधोपचार अंती बरी झाली आहेत सस्थस्थिती ८८ जनावरे उपचाराखाली आहेत. २ वासरांचा मृत्यू झाला आहे. हा आजार बरा होणारा असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. जनावरांना काही लक्षणे दिसल्यास पशू दवाखान्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
लस उपलब्ध करून देणार
लंपी प्रतिबंधात्मक लस या जनावरांना देण्यात येत आहे. तरीही काही शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना ही लस दिली नसल्यास त्यांनी पशू दवाखान्यांशी संपर्क साधावा. जनावरांसाठी ही लस उपलब्ध करून दिली जाईल असेही श्री. खेबुडकर यांनी यावेळी सांगितले.
हे करा...
लंपी आजार हा संसर्गजन्य असल्याने ज्या जनावरांना लंपी आजार झाला आहे त्या जनावरांना शेतकऱ्यांनी स्वतंत्र बांधावे. त्यांना मोकाट सोडू नये, तुर्तास त्यांना चरायलाही सोडू नये असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकूर यांनी केले आहे.