पुंडलिक कर्लेंच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक उपक्रम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 16, 2025 21:55 PM
views 60  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथे पुंडलिक अंबाजी कर्ले यांची 111 वी जयंती शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय,येथे विविध शैक्षणिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.

शिरगाव पंचक्रोशी (ता.देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुंडलिक अंबाजी कर्ले यांची 111 वी जयंती आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव, माध्यमिक विद्यामंदिर कुवळे तसेच पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगाव येथे विविध शैक्षणिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष यांच्या जयंतीनिमित्त पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने फाईन आर्ट्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पोस्टर मेकिंग कोलाज रांगोळी मेहंदी डिजाइन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

सदर स्पर्धां परीक्षणाची जबाबदारी डॉ.राजेंद्र चव्हाण, सौ श्रीजिता चव्हाण आणि चिंदरकर सर यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या पार पाडली. सदर स्पर्धांमध्ये स.ह. केळकर कॉलेज देवगड, एस.एन. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड, आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,  आणि कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव तसेच पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव येथील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. ही स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटात घेण्यात आली. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक सानिका विजय पुजारे द्वितीय क्रमांक तनुजा विजय बाईत तृतीय क्रमांक कलिका रविंद्र पवार आणि उत्तेजनार्थ गौरी समीर गावकर, तर कोलाज स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांत विजय हडकर ,द्वितीय क्रमांक मुकेश सुधीर जाधव तृतीय क्रमांक निखिल नागेश कांबळे आणि उत्तेजनार्थ विभागून सृष्टी मणिलाल पटेल व गितेश प्रमोद वळंजू, पोस्टर मेकिंग स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय गट प्रथम क्रमांक दर्शना संतोष जंगले द्वितीय क्रमांक जानवी संतोष पवार तृतीय क्रमांक अश्विनी गुरुनाथ चौकेकर आणि उत्तेजनार्थ मनोज सुधीर कोरगावकर पोस्टर मेकिंग स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालय गट प्रथम क्रमांक याज्ञिक दिनेश पाताडे द्वितीय क्रमांक भूषण निलेश नाईक तृतीय क्रमांक सौमित्र नित्यानंद कदम आणि उत्तेजनार्थ प्रसाद सुहास कदम तसेच मेहंदी स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय गड प्रथम क्रमांक अनुष्का विनायक पवार द्वितीय क्रमांक प्राजक्ता रामदास हडपिडकर तृतीय क्रमांक वेदिका कृष्णा जाधव उत्तेजनार्थ स्नेहा दत्तात्रय भस्मे मेहंदी स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालय गट प्रथम क्रमांक नेहा सत्यवान पवार द्वितीय क्रमांक रुद्रा रवींद्र शेटे तृतीय क्रमांक सलोनी संजय कदम उत्तेजनार्थ साक्षी राजेश केसरकर या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भाई कर्ले, कार्याध्यक्ष एड.  पी व्ही साटम, संस्थेचे सरचिटणीस .रघुनाथ चव्हाण, संस्था चेअरमन संभाजी साटम , महाविद्यालयाचे प्राचार्य  तारी सर तसेच संस्था पदाधिकारी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्या.कुंभार मॅडम आणि प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.