
कुडाळ : कुडाळ MIDC परीसरात संध्याकाळी व रात्री असभ्य वर्तन करणाऱ्यांवर १४ जणांवर कुडाळ पोलीसांची कारवाई करीत खटले दाखल केले आणि कुडाळ प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात पाठविण्यात आले असता १४ पैकी १२ इसमाना प्रत्येकी १२०० रु दंड ठोठावण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळ तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आहे. हे ठिकाण शहरापासुन काहीसे बाजुस असल्याने सायंकाळच्या वेळी तसेच रात्रौ अपरात्रौ या भागातील बंद कंपन्यांचे निर्मनुष्य परीसरात काही इसम दारुच्या पाटर्या, मित्र मैत्रीणीसोबत मोजमजा करण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे सदर ठिकाणी एखादा गंभीर गुन्हा घडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. अशा गैरप्रकार यांना रोखण्यासाठी . पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहीकर. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साठम यांनी त्याची दखल घेवुन सदर ठिकाणी गस्त वाढवण्याबाबत आदेश दिलेले होते. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी सदर टिकाणी पोलीसांची गस्त वाढविली. त्यामुदतीत कुडाळ पोलीसांमार्फत MIDC परीसरात गस्त केली. त्यामुदतीत MIDC परीसरात असभ्य वर्तन करणारे १ ) राजेश किशोर चव्हाण रा. नेरुर ता कुडाळ २ ) साजीद लतिफ रहमान कुल्ली रा. पिंगुळी ३. शुभम प्रकाश चव्हाण रा. कुडाळ ४. प्रकाश आनंद रजपुत रा. केळबाईवाडी कुडाळ ५. राजेंद्र लक्ष्मण साळकर रा. साळेल मालवण ६. साईराज दत्तात्राय तेली रा. कुडाळ ७. राहूल राजाराम पाटील रा. कुडाळ कुंभारवाडी, ८. ओंकार विजय पांचाळ रा. पिंगुळी, ९. अनिरुद्ध विश्वास गवंडे रा. पिंगुळी १०. आसिफ आदम शेख रा. नेरुर ११. संदेश सुभाष सावंत रा. आंदुर्ले १२. प्रविण गणपत सावंत रा. ओरोस १३. सुशांत सुभाष सावंत रा. आंदुर्ले १४. केतन चंद्रकांत चव्हाण रा. पिंगुळी असे इसम मिळून आल्याने त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११०/११७ प्रमाणे पोलीसांनी कारवाई करुन खटले मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, कुडाळ यांचे न्यायालयात पाठविण्यात आले. मा. न्यायालयाने सदर इसमांपैकी १२ इसमांना प्रत्येकी १२००/- रु प्रमाणे दंड केलेला आहे. पोलीसांचे अशा कारवाईमुळे या भागातील चोऱ्यांच्या तसेच इतर गैरप्रकारामध्ये घट झाल्याचे दिसुन येत आहे. सदर कारवाईत कुडाळ पोलीसांकडून सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान यापूर्वीही अनेकावर कारवाई करण्यात आली आहे सुरुवातीला महिला तरुणीचाही वावर खूप होता पोलीसांनी कारवाई सुरू केल्यावर यात घट झाली