
वैभववाडी : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त लोरे नं २येथे पुस्तक प्रदान सोहळा संपन्न झाला. सामाजिक कार्यकर्ते विजय मांजलकर यांनी २० हजार रुपये किंमतीची पुस्तके ही विद्यामंदिर मांजलकरवाडीला भेट दिली. गावचे सरपंच विलास नावळे यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तक प्रदान सोहळा संपन्न झाला.
आपल्या गावातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी येथील श्री मांजलकर यांनी ही पुस्तके शाळेला भेट दिली. त्यासोबत या पुस्तकांचे संरक्षण करण्यासाठी कपाट देखील शाळेला सुपुर्द केले. हा पुस्तक प्रदान सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रुचिता कदम, केंद्र प्रमुख संजय रासम, दिलीप मांजलकर, विजय मांजलकर,म्हाडा अधिकारी ज्ञानेश्वर संकपाळ, माजी सरपंच महेंद्र रावराणे, देऊ मांजलकर गुरुराज डोंगरे प्रकाश गव्हाणकर भास्कर पांचाळ सत्यवान तर्फे दीपक तर्फे दीपक रावराणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी श्री.नावळे यांनी पुस्तक दाते श्री मांजलकर यांचे आभार मानले. विद्यार्थ्यानी या पुस्तकांचे वाचन करावे.तसेच यातून चांगला बोध घेऊन जीवन उज्वल करावे असं आवाहन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील व आभार मुख्याध्यापक बाळू भांड यांनी मानले.