LIVE UPDATES

कोकणात संधी कुणाला ?

17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत
Edited by: विनायक गांवस
Published on: June 01, 2026 06:48 AM
views 33  views

सिंधुदुर्ग: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे.


भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यशस्वी झाली. तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्जांची छाननी 2 जून, अर्ज माघारीची मुदत 4 जून, 

मतदान 18 जून (स.8 ते दु.4) व

मतमोजणी 22 जून रोजी होणार आहे. 


भाजप- 1) सोलापूर-2) जळगाव-3) भंडारा-गोंदिया4) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली5) अमरावती-6) धाराशिव-लातूर-बीड7) नागपूर-8) छ.संभाजीनगर- जालना9) अहिल्यानगर-10) सांगली-सातारा11) नांदेड-


शिवसेना- 1) ठाणे-2) नाशिक-3) परभणी-4) यवतमाळ-


राष्ट्रवादी काँग्रेस- 

1) कोकण-2) पुणे कोकणात भाजप आणि शिवसेनेची जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीने ही जागा पुन्हा एकदा आपल्या पदरात पाडून घेतली आहे. खासदार सुनिल तटकरे यांचे चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे पुन्हा एकदा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणाहून लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.