
पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा
कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संतोष वायगणकर, कै. वसंत दळवी ग्रामीण वार्ताहर पुरस्कार भरत केसरकर यांना तर व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती छायाचित्रकार पुरस्कार जतीन भिसे यांना जाहीर झाला आहे.
कुडाळ तालुका पत्रकार समितीची सभा नुकतीच तालुका अध्यक्ष विजय पालकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हे पुरस्कार निश्चित करण्यात आले. व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संतोष वायगणकर याना देण्यात येणार आहे. कै. वसंत दळवी ग्रामीण वार्ताहर पुरस्कार माणगाव चे भरत केसरकर यांना जाहीर झाला आहे. व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती छाया पुरस्कार सावंतवाडीचे जतीन भिसे यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्कारांचे वितरण १६ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या या बैठकीला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि कुडाळचे सदस्य उमेश तोरस्कर, कुडाळच्या सचिव विठ्ठल राणे, उपाध्यक्ष रवी गावडे, विलास कुडाळकर, निलेश तेंडुलकर, निलेश जोशी जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन नाईक, ज्येष्ठ पत्रकार चंदू सामंत, प्रमोद ठाकूर, प्रमोद म्हाडगूत, अजय सावंत, गुरु दळवी, अरुण अणावकर, काशीराम गायकवाड, प्रसाद राणे, भरत केसरकर,वैशाली खानोलकर आदी पत्रकार उपस्थित होते.











