
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात योग चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी सदगुरू गावडे काका महाराज यांचे फार मोठे योगदान आहे. योग ही परमेश्वररुपी सेवा आहे. या सेवेतून सर्वांचे उज्वल भविष्य घडवा, आयुर्वेदात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या योगाचा प्रचार प्रसार होण्याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी माडयाचीवाडी येथे योग अभ्यास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आज केले.
आध्यात्मिक सदगुरू श्री श्री 108 महंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज संस्थापित श्री सदगुरू भक्त सेवा न्यास, सामाजीक संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असुन या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यत योगशास्राचे शस्त्र शुद्ध शिक्षण पोहोचावे प्रत्येक गावामध्ये प्रशिक्षित योगशिक्षक उपलब्ध व्हावेत आणि योगाच्या माध्यमातून समाजाचे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आरोग्य अधिक सक्षम व्हावे या उद्देशाने डिप्लोमा इन योगशिक्षक तसेच एम. ए. योगा या शैक्षणिक उपक्रमांना संस्थेने मान्यता प्राप्त करून घेतली.
श्री सदगुरू भक्त सेवा न्यासच्या माध्यमातुन सुरू झालेल्या डिप्लोमा इन एम. ए. योगा या अभ्यास वर्गाचे उद्घाटन आज रविवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ मठ माडयाचीवाडी येथे केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी महंत सदगुरू गावडे काका महाराज, जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर ,पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, राकेश केसरकर, एकनाथ गावडे, सुजय गावडे दाजी गोलम, आनंद सावंत, पंकज कामत , प्रीती कुशे, विघ्नेश गावडे ,केसर वानवडेकर, दत्तात्रय किनळेकर, गौरव मुंज ,तनया सुद्रीक ,प्राजक्ता साळगावकर ,पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून माडयाचीवाडीसारख्या ग्रामीण भागात धार्मिक कार्याबरोबरच सदगुरू गावडे काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योग चळवळ सुरू आहे यासाठी सर्वाचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो गावडे काकानी सखोल विचारांनी योग आणला योगाची महती देशात मोठ्या प्रमाणात वाढलीआहे सुदृढ पिढी करण्याचे माध्यम योगामध्ये आहे माणसाला निरोगी करण्याचे काम योगातून होत आहे.
योगाच्या माध्यमातून आपण करत असणारे कार्य जे परमेश्वर रुपी कार्य आहे प्रत्येकाने समाजसेवा करून ही योग चळवळ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी काम करा असे सागितले. गावडे काका महाराज म्हणाले योग अभ्यास सुरू असतानाच भविष्यात अनेक संकल्प मी हाती घेतले आहेत. येत्या काही महिन्यातच भव्य योग भवन साकारणार आहे तसेच विविध उपक्रमही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन योगशिक्षक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण केलेले आहे चालू शैक्षणिक वर्षात संस्थेला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून एम. ए. इन योग्य अभ्यासक्रमासाठी परवानगी प्राप्त झाली असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे एक गाव किमान दोन योगशिक्षक हा संकल्प असून या संकल्पनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत योग्य शिक्षणाचा प्रसार करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. जीवनाच्या प्रवाहात वाटचाल करताना आपल्याला आनंदीमय जीवन जगायचे आहे यासाठी योगा महत्वाचे आहे आपल्या भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्व असून समाजाच्या सेवा योगातून करा असे सांगितले योगशिक्षक आनंद सावंत सौ पाटील सौ कोरगावकर श्री बंगे यांनीसुद्धा योगबाबत मार्गदर्शन करताना सदगुरू गावडे काका महाराज यांनी माडयाचीवाडी पंचक्रोशीत विविध उपक्रम राबवताना योगासारखी चळवळ उभी केली आध्यात्मिक किमया या ठिकाणी राबवित आहेत असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राकेश केसरकर यांनी मानले यावेळी योगा शिक्षक तसेच योगा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.










