LIVE UPDATES

सनी पाटीलचा हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर

Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: June 20, 2026 19:16 PM
views 335  views

सावंतवाडी : सावंतवाडी पोलिसांमार्फत पाठवलेला सुनील उर्फ सनी बाळू पाटील ( वय - 38, राह. जिमखाना मैदान जवळ, सबनीसवाडा, सावंतवाडी)  याचा  हद्दपारचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी मंजूर केला असून, त्याला  सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी या तीन जिल्ह्यातून  हद्दपार करण्यात आले आहे. 

त्याला आदेश बजावल्यापासून दोन वर्षाकरिता हद्दपार कालावधी आहे. नमूद इसमास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्फत हद्दपारीचे आदेश पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर व लक्षण काळे यांनी बजावला असून त्याला पुढील दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.  तो बेळगाव निपाणी या ठिकाणी वास्तव्यास गेला आहे.  निपाणी पोलीस ठाण्यात याबाबत सावंतवाडी पोलिसांमार्फत तेथील पत्ता व वास्तव्य कळविण्यात आलेले आहे. त्याच्यावर वराह चोरी, मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते. त्याचे हद्दपारिबाबत प्रस्ताव पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक निलेश परब यांनी तयार करून वरिष्ठ कार्यालयामार्फत सादर केला होता.