LIVE UPDATES

सोनाली फाले भाजपात

Edited by: देवयानी वरसकर
Published on: October 30, 2024 13:43 PM
views 163  views

कणकवली : राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख सोनाली फाले यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये प्रवेश झाला. सोनाली फाले या गेली दोन वर्ष राष्ट्रीय समाज पक्ष  मध्ये जिल्हा महिला संपर्कप्रमुख कार्यरत होत्या. सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असून अनेक बचत गट महिलांची त्यांच्या दंडगा संपर्क आहे. माहितीने महिलांसाठी राबवलेल्या योजना महिलांपर्यंत पोचवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे तिन्ही उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सोनाली फाले यांनी सांगितले.

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या प्रयत्नातून हा प्रवेश घेण्यात आला.यावेळी विधानसभा प्रमुख तथा पडेल मंडल अध्यक्ष रामचंद्र बाळू  कोकरे, कणकवली तालुका शहराध्यक्ष सुरेश जंगले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.