
कणकवली : हॅपिनेस प्रोग्राम म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेद्वारे चालवला जाणारा एक शिबिर आहे. मनुष्याच्या जीवनात धावपळीमुळे निर्माण झालेली अस्थिरता व तणाव कमी करण्यासाठी मदत करतो. मन शांत ठेवण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी योगासने, श्वासोच्छवासाचे व्यायाम होणारी सुदर्शन क्रिया आणि व्यावहारिक ज्ञानावर आधारित आहे. ज्यामुळे व्यक्ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अधिक आनंदी व समाधानी राहण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कणकवलीत आयोजित केलेल्या हॅप्पीनेस प्रोग्रामला चांगला प्रतिसाद लाभला आहे.
हॅप्पीनेस प्रोग्राम कणकवली उत्कर्षा हॉल, कणकवली येथे १६ डिसेंबर पासून सुरु आहे. या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून उमेश वायंगणकर श्री श्री रविशंकर यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या सुदर्शन क्रियेबद्दल मौलिक मार्गदर्शनाचे धडे देत आहेत. या प्रोग्रामला सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळांमध्ये स्त्री व पुरुष मिळून 55 ते 60 जणांनी सहभाग घेतलेला आहे. समाजातील विविध घटक या हॅप्पीनेस प्रोग्राममध्ये सहभागी झाले आहेत.
या शिबिरात श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून तयार झालेली जगप्रसिद्ध व जीवनाला कलाटणी देणारी दिव्य " सुदर्शन क्रिया " शिकवली जात आहे. त्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी , तणावमुक्त होण्यासाठी , अस्वस्थता कमी होण्यासाठी , सकारात्मकता वाढविण्यासाठी , उत्साह वाढण्यासाठी , निरोगी , शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी , मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी , आरोग्याची खरी काळजी घेण्यासाठी या हॅप्पीनेस प्रोग्राम मध्ये मार्गदर्शन केले जात आहे. सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना एक नवीन जीवन प्रवास या ठिकाणी अनुभवायला मिळत असल्याने सर्वांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.











