सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या ट्रान्सफार्मर डीपीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांच्यावेली वायरीमध्ये गुटाळल्याने स्पार्कींग होत होतं. याची कल्पना उपजिल्हा रुग्णालयातील इन्चार्ज राणे यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना दिली. यावेळी त्यांनी तात्काळ एमईसीबीचे अधिकारी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर महावितरणचे कर्मचारी अक्षय गावकर, धनंजय मांजरेकर व सचिन धोंड यांची मदत घेऊन लगेचच तासाभरात ही झुडपे तोडून डीपी- ट्रान्सफार्मरकडे जाणारी वाट मोकळी केली. या ठिकाणची सर्व झाडे झुडपे कर्मचाऱ्यांनी तोडून ती जागा साफ करून सर्व वायरीवरच्या वेळी तोडून टाकल्या. त्यामुळे सतत होणार स्पार्क कर्मचाऱ्यांच्या तत्काळ मदतीमुळे दूर होऊन पुढे होणारी दुर्घटना टळली. यासाठी इन्चार्ज राणे यांनी सामाजिक बांधिलकीचे व एमईसीबीचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानते.
सोमवारी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना भेट देऊन डीपीच्या कॅम्पसमध्ये पेवर ब्लॉक बसवून देण्याची मागणी करणार आहेत. जेणेकरून पुन्हा मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढवून त्या ठिकाणी स्पार्क होऊन अनर्थ घडू नये यासाठी ही मागणी करणार आहे. तसेच मीटर असलेली शेड पूर्णपणे मोडखळीस आली आहे त्याचीही दुरुस्ती करण्याची मागणी करणार असून कॅम्पस मध्ये दारूच्या बॉटल फोडून टाकल्यामुळे सदर एमईसीबीच्या पायाला काचा लागून इजा झालेल्या आहे याचाही बंदोबस्त करण्याची विनंती करणार आहोत. याप्रसंगी सामाजिक बादलकीचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी या कामासाठी पुढाकार घेऊन सतर्कता दाखवल्यामुळे उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले आहे.