श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलात 'माझी रसोई माझी सुरक्षा'

Edited by: मनोज पवार
Published on: November 30, 2024 16:30 PM
views 74  views

 खेेड  : खेड एच.पी बुटाला गॅस आणि एच.पी.सी.एल कंपनी यांच्यातर्फे गॅस वापरा संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांसाठी माहिती व कार्यशाळेची आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये सातारा एरिया मॅनेजर चंद्रकांत निमेश हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. एच.पी. बुटाला गॅस डिलर खेड चे मालक अमोल बुटाला, श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूल खेडचे प्रभारी मुख्याध्यापक  उत्तम कांबळे सर सर्व शिक्षक व विद्यार्थी या कार्यशाळेसाठी हजर होते .

 श्री कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कार्यशाळेचा उद्देश विशद केलं.  तर अमोल बुटाला यांनी गॅस वापरताना घ्यावयाची काळजी उपायोजना व आपत्कालीन परिस्थितीमध्ये करावयाचे फोन यासंदर्भातील माहिती दिली. सातारा एरिया मॅनेजर चंद्रकांत निमेश यांनी दोन व्हिडिओच्या माध्यमातून गॅस सुरक्षा संदर्भातील माहिती दिली. अनेक शंकांचे निरसन केले. संजयजी बुटाला यांनी आपल्या मनोगतात एच.पी बुटाला गॅस खेड यांचे चाललेले कार्य व ग्राहकांजवळ त्यांची असणारे जिव्हाळ्याचे संबंध विशद केले व गॅस संदर्भातील आपली जबाबदारी अमोल बुटाला किती चांगल्या प्रकारे पार पाडतात हे समजावून सांगितले. प्रश्नोत्तरांच्या वेळेत अमोल बुटाला यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याबद्दल मुलांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी एच.पी. बुटाला गॅसचे मॅनेजर त्रिंबककर यांनी गॅस चालवताना वापरण्यात येणारे वस्तू यांची माहिती दिली.

 शेवटी पर्यवेक्षिका लोखंडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर धुत्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व २३० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गॅस संदर्भात दिलेल्या माहितीमुळे सर्वांनी एच.पी बुटाला यांचे मनोमन आभार व्यक्त केले.