
कणकवली : अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दिगवळे - गावडेवाडी येथील राजेंद्र अंकुश नेवाळकर (५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत राजेंद्र यांचे चुलत भाऊ प्रदीप नाना नेवाळकर (४९, दिगवळे - गावडेवाडी) यांच्या खबरेनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.











