LIVE UPDATES

डामरेतील शिबिरात २१ दात्यांचे रक्तदान

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 26, 2026 18:43 PM
views 14  views

कणकवली : कै.सावंत बाबा यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ डामरे येथे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व स्वामी समर्थ मठ देवस्थान डामरे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २६ जुलै २०२६ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.यात एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत व डामरे सरपंच किरण कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत डामरे पोलीस पाटील विश्वास सावंत, साईनाथ सावंत,डामरे तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ साटम, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवलीचे अमोल भोगले, कार्यकारी सदस्य विनायक पारधिये, श्री. पारकर, कृष्णा राणे, श्री कुबडे आदी मान्यवर उपस्थित होते.नवजीवन ब्लड सेंटरच्या डॉ.सुप्रिया पाटील, दादा कोरडे व टीमने रक्तसंकलन केले. शिबीर यशस्वी होण्यासाठी विनायक पारधिये, साईनाथ सावंत व इतर स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले. डामरे गावातील या वर्षातील हे तिसरे रक्तदान शिबीर आहे.