
कणकवली : बंगळूरू येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी (५३) यांच्या क्रूर हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या चारही संशयित आरोपींच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सुभाष सुब्बारायप्पा एस (३२), नरसिंम्हा नारायण स्वामी मूर्ती (३६), मधुसूदन सिद्धप्पा तोकला (५२) आणि मनु पी बी (४२) या चारही संशयितांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना कणकवली पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यातील अन्य ५ संशयितांना ताब्यात घेणे व इतर बाबींच्या तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली, असता न्यायालयाने चारही संशयिताना दोन दिवसाची वाढीव कोठडी दिली.













