
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आज दि ६ जानेवारी रोजीसकाळी १० वाजता सिंधुदुर्ग नगरी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन सभागृहात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन व जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या या पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याचे मत्स्यद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार दीपक केसरकर ,आमदार निलेश राणे,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर ,पुढारी न्युज चैनल संपादक प्रसन्ना जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, आदींसह पदाधिकारी सभासद सदस्यउपस्थित राहणार आहेत
तरी या पत्रकार दिन आणि जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिव दिलीप उर्फ बाळ खडपकर यांनी केले आहे.











