'त्या' खातेप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावा

सभापती सिद्धेश रावराणेंचे आदेश
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 25, 2026 12:23 PM
views 654  views

वैभववाडी :  वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा आज सुरू होताच खातेप्रमुखांच्या उपस्थितीचा मुद्दा गाजला. पहिल्याच सभेला खातेप्रमुख अनुपस्थित राहिल्याने सदस्य मंगेश लोके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंचायत समितीचे काही अधिकारी उपस्थित असताना इतर अधिकारी गैरहजर राहणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी सांगत संबंधितांना समज देऊन स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी केली. यावर सभापती सिद्धेश रावराणे यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले.

सभेच्या प्रारंभी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पंचायत समितीला सुसज्ज इमारत उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा अभिनंदन ठराव मंगेश लोके यांनी सभेत मांडला.