LIVE UPDATES

uday samant : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले 'सिंधुदुर्गचा राजा'चे दर्शन

कुडाळमध्ये प्रतिष्ठानतर्फे सत्कार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 18, 2026 16:28 PM
views 15  views

कुडाळ : राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी आज कुडाळ येथे विराजमान झालेल्या प्रसिद्ध 'सिंधुदुर्गचा राजा' गणपतीचे भावपूर्ण वातावरणात दर्शन घेतले. श्रींच्या चरणी लीन होत त्यांनी जिल्ह्यातील व राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.

दर्शन सोहळ्यानंतर 'सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान'च्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, विनायक राणे, दीपक नारकर, रूपेश कानडे, अभिषेक गावडे, रोहीत भोगटे यांच्यासह प्रतिष्ठानचे इतर सर्व पदाधिकारी, सदस्य आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शन सोहळ्यानंतर उद्योगमंत्र्यांनी उपस्थित स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.