मातोंड गावातील ५१ लाखाच्या विविध कामांचा शुभारंभ

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक मनिष दळवी यांची उपस्थिती
Edited by:
Published on: March 13, 2025 20:37 PM
views 316  views

वेंगुर्ला : महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर व पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या मातोंड गावातील सुमारे ५१ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

मातोंड गावातील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मंजू झाली असल्याने सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांनी महायुती सरकारचे यावेळी ऋण व्यक्त केले. मातोंड काजीरमळा ते बामणाचे टेंम्ब रस्ता ग्रामा. ११७ खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी १० लाख, मातोंड गावठणवाडी गावडेकाठ येथे वळण बंधारा बांधणे या कामासाठी १४ लाख, मातोंड गंडाचीराई रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी ७ लाख, मातोंड सावंतवाडा येथे बंधारा बांधणे या कामासाठी १५ लाख व मातोंड ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण कामासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या सर्व कामांचे भूमीपूजन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी गावच्या सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू दीपेश परब, किशोरी परब, आर्या रेडकर, किरण मातोंडकर, वैभवी परब, सुजाता सावंत, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, मातोंड सोसायटी चेअरमन मकरंद प्रभू माजी उपसरपंच सुभाष सावंत, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुधाकर परब, सोसायटी संचालक पप्पू सवांत, शेखर परब, नंदकिशोर घाडी, श्रीकांत परब, नितीन परब, रवी नाथ, चंद्रकांत गावडे, काका सावंत, महेश बडाचेपाटकर, ठेकेदार संजीव परब, कौस्तुभ प्रभू, गोविंद सावंत, अशोक सावंत आदीसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातोंड गावात यापूर्वीही आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विविध कामे झाली आहेत. आता पालकमंत्री या नात्याने राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांचीही ताकद जिल्हा विकासाला मिळाली आहे. नीतेश राणेंचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे या गावावर पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे भविष्यातही जी जी कामे निघतील ती पूर्णत्वाकडे जातील. गावच्या विकासात राजकीय हेवेदावे आड येऊ नयेत यासाठी प्रत्येकाने दक्ष रहा. एकोप्याने गावचा संपूर्ण विकास साधता येतो. आम्ही कोणतेही काम असो ते तडिस नेण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे यावेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले.