
सावंतवाडी : तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलावाचे सुशोभीकरण आणि दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या सुशोभीकरणासाठी सुमारे 52 लाख रुपये एवढा निधी व महाराष्ट्र राज्य जलसंवर्धन विभागमार्फत मंजूर झाले असून तसेच या तळीच्या पाण्याचा वापर पूर्वी पिण्यासाठी व शेती किंवा भाजीपाला लागवडीसाठी केला जात असे. तलावाचे बांधकाम पाहणीसाठी नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली.
यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे अन्य शिवसेना पदाधिकारी, तिरोडा सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर, सदस्य रत्नाकर आडारकर, सदस्या विश्रांती साळगांवकर, सुचित्रा जाधव, ग्रामविकास अधिकारी मुकुंद परब,श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती अध्यक्ष लक्ष्मण साळगांवकर, सचिव अनिल केरकर, सदस्य सुधाकर पेडणेकर, प्रवीण केरकर,संतोष पेडणेकर,नामदेव साळगांवकर,वामन शेणई, तिरोडा ग्रामविकास मंडळ मुंबई खजिनदार शरद गोडकर, पंढरीनाथ सावंत, पोलीस पाटील लवू रगजी, गंगाराम केरकर, महेश्वर केरकर, पुरुषोत्तम शेणई,सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर, साबाजी मांजरेकर, ठेकेदार मच्छिंद्र तांडेल व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.










