
सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे नूतन नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
दरवर्षी दिले जाणारे मानाचे जिल्हा स्तरावरील ज्ञानदीप पुरस्कार २०२५ हा पुरस्कार वितरण सोहळा २५ डिसेंबर रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी नूतन नगराध्यक्षांना निमंत्रण पत्रिका देऊन आमंत्रित केले. यावेळी संस्थापक वाय पी नाईक, अध्यक्ष जावेद शेख, एस आर मांगले, सहसचिव विनायक गावस, कळसूलकरचे मुख्याध्यापक एस व्ही भुरे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा.रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.











