
सिंधुदुर्ग : जागतिक स्तरावर दरवर्षी २४ मार्च हा दिवस क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. राज्यात दिनांक ०७ डिसेंबर २०२४ पासुन १०० दिवस मोहिमेच्या निमित्ताने विविध प्रभावी प्रसार व प्रचार माध्यमांचा वापर करुन आपण क्षयरोगाविषयी जनजागृती करणेत येत आहे.
क्षयरोग दिनाचे औचित्य साधून क्षयरोगाविषयी जनजागृतीची व्याप्ती अधिक वाढविण्यासाठी हा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करणे आवश्यक आहे. क्षयरोगाच्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त
२४ मार्च २०२६ साठी प्रसारित केलेले घोषवाक्य खालीलप्रमाणे
इंग्रजीः . “Yes! We can End TB : Led by Govt Of Maharashtra Powered by Janbhagidari ”
Yes! We can End TB : Led by District Administration Powered by Health Worker
मराठीः."होय आपण क्षयरोगाचा अंत करु शकतो जनभागीदारी सर्मथित
:."होय आपण क्षयरोगाचा अंत करु शकतो आरोग्य कर्मचारी सर्मथित
वरील घोषवाक्यानुसार क्षयरोग संपविण्यासाठी सर्वांनी मिळुन एकत्रित पणे कार्यवाही करण्यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याच आरोग्य अधिकाऱ्यांच म्हणण आहे.
निमित्त क्षयरोगाविषयी समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याकरीता जनभागीदारीच्या माध्यमातुन समाजाचे सहकार्य घेणे अपेक्षित आहे. या करिता जिल्हास्तर, तालुका स्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर लोकप्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, पंचायत राज संस्थेचे अधिकारी ध् कर्मचारी, युवा, धर्मगुरु व स्वयंसेवक, निक्षय मित्र व टी बी चॅम्पियन यांचा सहभाग घेवुन क्षयमुक्ती बाबत कार्यक्रम आयोजन करणेत येणार आहे.
उपक्रेद्र स्तरावर जनजागृती रॅली, गर्दीच्या ठिकाणी पथनाटये, निक्षय मित्र सन्मान कार्यक्रम, टीबी तपासणी व स्क्रिनिग शिबिरे, शाळा महाविदयालय स्तरावर निबंध, पोस्टर स्पर्धाचे आयोजन करणेत येणार आहे. विविध सांस्कृतीक कार्यक्रम, बैठका, चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने या ठिकाणी क्षयरोगाविषयक विविध प्रसिध्दी साहित्याचे प्रदर्शन करणेत येणार आहे. अशा प्रकारे समाजातील सर्व स्तरावर विविध माध्यमाव्दारे कार्यक्रमाचे आयोजन करुन २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणुन साजरा करण्यात करणेत येणार आहे.












