
दोडामार्ग : स्त्रियांवर अत्याचार करून संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी केली, अशा अशोक खरात यांच्या सोबत या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचे फोटो व्हायरल होत आहेत. भोंदू बाबा बरोबर काम करून दीपक केसरकर यांनी भोंदूगिरी करूनच सर्व निवडणुका जिंकल्या आहेत अशा भोंदूगिरी करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांचे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख संजय गवस व पदाधिकऱ्यांनी जाहीर निषेध केला आहे.
ठाकरे शिवसेनाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संजय गवस बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपतालुकाप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, उपसंघटक विजय जाधव, उप तालुका प्रमुख संदेश राणे, विभाग प्रमुख दिवा गवस, दशरथ मोराजकर, महिला प्रमुख विनिता घाडी, महिला उपतालुकाप्रमुख रेश्मा, सिद्धू कासार, प्रदीप सावंत, संजय सुतार, प्रकाश कदम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गवस बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील काही नेते अशोक खरात यांना सामील आहेत. सावंतवाडी मतदार संघातील आमदार दीपक केसरकर यांचाही अशोक खरात यांच्याशी चांगलाच संबंध आहे.आम्हाला लाज वाटते की केसरकर यांचा खरात यांच्याशी संबंध आहे. त्यामुळे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इथल्या जनतेने विशेष करून स्त्रियांनी विचार करावा की आपल्या मतदारसंघातील आपण निवडून दिलेले आमदार कसे आहेत ते. अशीच भोंदूगिरी करून दीपक केसरकर प्रत्येक निवडणूक निवडून आलेले आहेत असा आरोप 2000 पक्षाकडून करण्यात आला आहे.
चोरलेल्या पक्षाचे नेतृत्व संजू परब यांच्याकडे
दरम्यान गवस बोलताना म्हणाले की संजू परब यांनी एक वक्तव्य केलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाकरे शिवसेना संपली. असं म्हणणाऱ्या संजू परब यांनी स्वत: चार पक्ष फिरून आल्यावर चोरलेल्या पक्षाचे नेतृत्व आज ते करत आहेत. हे त्यांनी आत्मपरीक्षण करावा अन्यथा अशा नेत्याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा गवस यांनी दिला.
गॅस सिलेंडरचा 45 दिवसांचा कालावधी रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू...
इरण इस्त्राईल इथे सुरू असलेल्या युद्धाच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचा तुटवडा दाखवला जात आहे. ऑनलाइन बुकिंग करताना 45 दिवसाचा कालावधी जाणून-बुजून ठेवण्यात आलेला आहे. 45 दिवसांचा कालावधी रद्द करून बुकिंग करणाऱ्या नागरिकाला गॅस सिलेंडर द्या अन्यथा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरून असा इशारा सत्ताधारी पक्षाला देण्यात आला.
ठाकरे शिवसेना अमर नाही तर प्रवीण परब अमर झाले...
कोलझर पंचायत समिती मतदार संघातून ठाकरे शिवसेनेकडून चांगले व्यक्तिमत्व म्हणून प्रवीण परब यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐन वेळेस पैशाच्या आमिषाला की पदांच्या अमिषाला भाळून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असा आमचा थेट आरोप आहे. ज्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला त्या दिवसापासून प्रवीण परब यांचा ठाकरे शिवसेनेशी काडीचाही मात्र संबंध नाही. दोडामार्गची ठाकरे शिवसेना अमर झाली असं म्हणणारे प्रवीण परबच अमर झाले आहेत. प्रवीण परब हे चांगले व्यक्तिमत्व होते पक्षाकडे एवढे उमेदवार असताना आम्ही प्रवीण परब यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली. मात्र प्रवीण परब यांनी पक्षाशी गद्दारी केली. स्वतःचं प्रायचित्त करण्यासाठी व आपल्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनीही आज उशिरा पत्रकार परिषद घेतली.










