
सावंतवाडी : माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ तथा सेवानिवृत्त वन कर्मचारी आत्माराम उर्फ नाना मांजरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या रस्त्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रेडकरवाडी झरी गणपती विसर्जन तळी ते ईशवटी मंदिर मार्गे स्मशानभूमी या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण काम मंजूर करण्यात आले असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, शिवसेनेचे मळगांव उपविभाग प्रमुख संदेश सोनुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सचिन रेडकर, भाजपचे बुथ अध्यक्ष दीपक जोशी, दिवाकर खानोलकर, गोविंद मांजरेकर, प्रितम सातार्डेकर, विवेक पेडणेकर, विनय पेडणेकर आदी उपस्थित होते. हा रस्ता मंजूर झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.











