
सावंतवाडी : सावंतवाडीकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणाऱ्या 'आनंदोत्सव' प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे यंदा चौथे वर्ष आहे. या यशस्वी ४ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
आर. पी. डी. हायस्कूलच्या मैदानात हे प्रदर्शन दि. २४ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे खेमसावंत भोसले आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'आनंदोत्सव' टीमने गेल्या चार वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. यंदाही या प्रदर्शनात विविध गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ आणि आकर्षक उत्पादनांची विक्री व प्रदर्शन होणार आहे. या सोहळ्याला आणि प्रदर्शनाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजिका पौर्णिमा सावंत यांनी केले आहे.












