
सावंतवाडी : एका महिन्याच बील थकित असल्यास सामान्यांचा वीज पुरवठा बंद करता, स्मार्ट मिटर लावण्यासाठी जबरदस्ती करता. मग, १७ लाख थकबाकी असलेल्या शासकीय कार्यालयांची वीज खंडीत का करत नाही ? असा कोणता शासन निर्णय आहे का, असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला. तसेच हॉटेल व्यावसायिकांवर आलेल संकटं बघता वीज भिल भरण्यासाठी तगादा लावू नये, पुरवठा खंडित करू नये असे आवाहन त्यांनी केले.
येथील एका महिन्याचे बील थकित असल्याने हॉटेल व्यावसायिकांचा वीज पुरवठा खंडीत केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन आक्रमक पवित्रा घेतला. उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षेंना त्यांनी जाब विचारला. आखाती देशांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती बघता हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आलेत. चालू महिन्याच बील थकीत असल्यास वीज खंडीत कसली करात ? स्मार्ट मिटर लावण्यासाठी धमक्या कसल्या देतात ? असा सवाल केला. तसेच तालुक्यातील १७ लाख थकबाकी असलेल्या शासकीय कार्यालयांची वीज खंडीत का करत नाही असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. केसरकर यांनी केला. तसेच युद्धजन्य परिस्थिती आटोक्यात येत नाही तोवर हॉटेल व्यावसायिकांना वीज बिल भरणा करण्यासाठी मुदत द्या असे शहरप्रमुख ॲड राजू कासकर यांनी सांगितले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष ॲड राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत,उदय सावंत आदी उपस्थित होते.











