LIVE UPDATES

आर्थिक साक्षरता - सायबर सुरक्षेवर 'घुंगुरकाठी’तर्फे व्याख्यान

गौतमी महाजन साधणार ओरोस येथे संवाद
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 20, 2026 12:06 PM
views 23  views

सिंधुदुर्गनगरी : योग्य आर्थिक गुंतवणूक आणि सायबर फसवणुकीपासून सावधानता याबाबत जागृती करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिंधुदुर्गनगरी शाखेच्या शाखा व्यवस्थापक गौतमी महाजन यांचे 'सुरक्षित गुंतवणूक, आर्थिक साक्षरता आणि सायबर सुरक्षा' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. घुंगुरकाठी स्वयंसेवी संस्थेने ‘अर्थसंवाद’ म्हणून आयोजित केलेले हे व्याख्यान ओरोस येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात मंगळवारी २३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता होईल.

आजकाल बहुतेक सर्व आर्थिक व्यवहार रोखीने न होता डिजिटली आणि ऑनलाईन होत आहेत. खरेतर ही खुप चांगली सुविधा आहे. पण अशा व्यवहारात बरेचदा अज्ञानामुळे अनेकांची फसवणुक होते. सायबर क्राईम करणारे सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात आणि लूट करतात. वॉटस्एपवर लिंक टाकणे आणि अकाऊंट रिकामे करणे, ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मागून फसवणुक करणे, एटीएमवर फसवणुक करणे, जास्त व्याजाचे आमिष दाखवणे अशा प्रकारे लाखो रुपयांची लूट झाल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो. यातून कसे वाचायचे? आपली फसवणुक कशी टाळायची? जर चुकून असे काही झाले तर खबरदारी घ्यायची? याचे उत्तर ‘डिजिटल साक्षर व्हायचे' असे आहे. याचबरोबर आपले पैसे सुरक्षितरित्या कसे गुंतवायचे, यासाठी शाखाधिकारी गौतमी महाजन यांचे 'आर्थिक साक्षरता आणि सायबर सुरक्षा' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

हे व्याख्यान सर्वाना उपयोगी असेल आणि सोप्या भाषेत असेल. आपण आपले कुटुंबिय, सहकारी, मित्रपरिवार यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. साधारण तासाभराचा हा कार्यक्रम मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता खर्येवाडी (जैतापकर कॉलनी) येथील दत्तराज गृहनिर्माण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात होईल. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे, असे आवाहन ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले आहे.