LIVE UPDATES

आजगाव येथील मायनिंग विरोधी जनजागृती रॅली रद्द

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 20, 2026 13:42 PM
views 77  views

सावंतवाडी : आजगाव दशक्रोशी मायनिंग विरोधी संघर्ष समिती यांनी मंगळवार २३ जून रोजी आयोजित केलेली जनजागृती रॅली  काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.

या रॅलीचा मार्ग श्री देव वेतोबा मंदिर, आजगाव येथून रॅली सुरू होऊन शिरोडा मार्गे श्री देव वेतोबा मंदिर, आरवली येथे पोहचणार होती व त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला आजगाव दशक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, युवक, महिला व नागरिकांनी सायं. ४ वाजता श्री देव वेतोबा मंदिर, आजगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन ही करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव ही रॅली रद्द करण्यात आल्याचे आजगाव दशक्रोशी मायनिंग विरोधी संघर्ष समितीने सांगितले.