LIVE UPDATES

जिल्हा बँकेच्यावतीने 10 संस्थांच्या व्यवस्थापकीय समित्यांच्या सत्काराचे आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 08, 2026 17:24 PM
views 44  views

मालवण : बँक पातळीवरील वसुलीपात्र कर्जाची 100 टक्के परतफेड (कर्ज वसुली) केलेल्या मालवण तालुक्यातील 10 संस्थांच्या व्यवस्थापकीय समितीचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनीष दळवी व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वा. नाथ पै. सेवांगण हॉल धुरीवाडा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे

मालवण तालुक्यातील पेंडूर विकास संस्था, विरण ग्रुप विकास संस्था, सातेरी विकास संस्था काळसे, रामेश्वर विकास संस्था चिंदर, वायंगणी विकास संस्था, श्री रामेश्वर विकास संस्था आचरा, त्रिंबक ग्रुप विकास संस्था, बांदिवडे विकास संस्था, श्रावण विकास संस्था, असरोंडी विकास संस्था यांचा सन्मान यावेळी होणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. विकास अधिकारी कार्यालय मालवण यांच्या वतीने देण्यात आली आहे.