हनुमान जयंतीनिमित्त आयनोडेत माजी सैनिकांचा सन्मान सोहळा

Edited by:
Published on: April 01, 2026 15:58 PM
views 44  views

दोडामार्ग : आयनोडे पुनर्वसन येथे हनुमान जयंतीच्या पावन निमित्ताने आयनोडे गावात यंदा विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव भुतनाथ सातेरी पंचायतान देवस्थान समिती व ग्रामस्थ मंडळ, आयनोडे पुनर्वसन यांच्या संयुक्त विद्यमाने "सन्मान सैनिकांचा, अभिमान आमच्या गावाचा" या उपक्रमांतर्गत गावातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

हा सन्मान सोहळा बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित करण्यात आला असून, हनुमान जयंती निमित्त होणाऱ्या नाट्यप्रयोगाच्या अगोदर हा कार्यक्रम पार पडणार आहे. देशसेवेसाठी योगदान दिलेल्या आणि सध्या सेवा निवृत्त झालेल्या गावातील सर्व माजी सैनिकांचा यावेळी गावाच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी माजी सैनिकांनी आपला सैनिकी गणवेश परिधान करून वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सन्मानासाठी निमंत्रित माजी सैनिकांमध्ये शंकर भद्रीके, महादेव कृष्णा सावंत, सत्यवान लक्ष्मण नाईक, कृष्णा रामा ठाकूर, उदय लाडू सावंत, रामचंद्र विठोबा सावंत, रामदास तुकाराम चौगुले, हरीभाऊ देसाई, मिलिंद जयराम सावंत, चंद्रकांत भिकाजी आयनोडकर, अभिजित विकास ठाकूर, राजन पांडुरंग सावंत, नारायण मधुकर ठाकूर आणि निलेश लक्ष्मण सावंत यांचा समावेश आहे.

या उपक्रमामुळे गावात देशभक्तीची भावना अधिक दृढ होणार असून, तरुण पिढीला प्रेरणा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.