सिंधुदुर्गातील 12 गरजू रुग्णांना - होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्टचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 01, 2026 13:56 PM
views 60  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील कै. डॉ भाऊसाहेब परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबईतील कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारा गरजू रुग्णांना व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

पेंडूर येथील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विद्यार्थी मोहन गावडे, काॅम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थीनी सिमरन चव्हाण, तनिषा नाईक, संजना सावंत, पेंडूर येथील गॅंगरिन या आजाराने ग्रस्त बाबना तांडेल, गर्भाशयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त विलासिनी गावडे,कोलगाव येथील विद्यार्थी प्रथमेश धुरी, मळगाव येथील पोटाच्या विकाराने ग्रस्त राकेश राणे, झाराप येथील स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रस्त स्वानंदी गावकर, असनिये येथील उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त सुमित्रा असनियेकर, किडनीच्या विकाराने ग्रस्त शंकर सावंत आणि शेर्ले येथील दिव्यांनी मुलाची आई प्रतिक्षा काळसेकर अशा बारा गरजू लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.