
रत्नागिरी : कॅप्सन इन्स्टिट्यूट कोटा रत्नागिरी शाखेतर्फे घेण्यात येत असलेल्या इयत्ता अकरावी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा एक महिन्याचा फाउंडेशन कोर्स आज दिनांक एक एप्रिल 2026 पासून उत्साहात सुरू झाला. विद्यार्थ्यांचा इयत्ता अकरावी सायन्स प्रवेश घेण्याआधी विज्ञान व गणित या विषयांचा पाया भक्कम व्हावा या हेतूने कॅप्सन इन्स्टिट्यूट कोटा मार्फत फाउंडेशन कोर्स घेतला जातो.
या फाउंडेशन कोर्ससाठी यावर्षी रत्नागिरी, लांजा, देवरुख, देवगड, कणकवली व पंचक्रोशीतील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनायक निकम यांनी केले. दि न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी चे सचिव श्री राजीव गोगटे सर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले, यापुढील दोन वर्षातील विद्यार्थ्यांसमोरील शैक्षणिक आव्हानांबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कॅप्सन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रो.संजय वसगडेकर यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना कॅप्सन इन्स्टिट्यूट राबवत असलेल्या शैक्षणिक सुविधांबाबत सर्वांना अवगत केले.
विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना आपण पालकांचे नक्कीच काहीतरी देणे लागतो आणि हे देणे आपण उत्तम अभ्यास करून व चांगले करिअर घडवून पालकांना दिले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना जागरुक केले. श्री विनायक निकम यांनी सर्वांचे आभार मानले.












