LIVE UPDATES

कुडाळ शहराच्या वैभवात भर

संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथे आकर्षक 'डॉल्फिन कारंजे' सज्ज!
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 27, 2026 17:40 PM
views 53  views

कुडाळ : कुडाळ शहराच्या सुशोभीकरणामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कुडाळ एमआयडीसी रस्त्याचे नुकतेच काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले असून, आता या रस्त्यावरील प्रमुख केंद्र असलेल्या 'संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल' येथे एक अत्यंत आकर्षक आणि देखणा डॉल्फिन प्रतिकृती असलेला कारंजे (फाउंटन) बसवण्यात आला आहे. या नवीन कारंजेमुळे कुडाळ शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून नागरिकांमधून याचे कौतुक होत आहे.

कुडाळ शहराचा कायापालट करण्यासाठी आणि शहराला आधुनिक रूप देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आमदार निलेश राणे यांच्या विशेष संकल्पनेतून आणि कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर यांच्या सातत्यपूर्ण आणि खंबीर पाठपुराव्यामुळे हा डॉल्फिन कारंज्याचा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. एमआयडीसी रस्त्याच्या काँक्रीटीकरणानंतर या सर्कलचे सुशोभीकरण करणे गरजेचे होते, जे आता अत्यंत देखण्या स्वरूपात साकार झाले आहे.

सर्कलवरील या डॉल्फिन कारंज्याचे पूर्ण झाले असून, लवकरच याचे रीतसर लोकार्पण केले जाणार आहे. हा कारंजा सायंकाळच्या वेळी कुडाळवासीयांसाठी आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या विकासकामांबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार निलेश राणे आणि नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांचे विशेष आभार मानले आहेत.