LIVE UPDATES

देवगडमध्ये लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

जि. प. सदस्य देवदत्त कदम, प. स. सदस्य शीतल तावडे यांच्याकडून पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 29, 2026 20:07 PM
views 168  views

देवगड : प्रतिकूल हवामानामुळे भातपिकाचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, व पंचायत समिती सदस्य शीतल तावडे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी देवगड तालुक्यातील सांडवे, कुवळे, साळशी, शिरगाव परिसरात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.

पावसातील अनियमितता व प्रतिकूल हवामानामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य शीतल तावडे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, जि.प.सदस्य देवदत्त कदम, प. स. सदस्य शीतल तावडे, सलोनी तळवडेकर, सरपंच सुभाष कदम, उपसरपंच सुहास राणे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप पोवार, ग्रामहसूल अधिकारी अंधारी भाऊ, मंडल कृषी अधिकारी शिरगांव डॉ. बापूसाहेब लांबडे, निकेतन राणे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक, देवगड सहाय्यक कृषी अधिकारी अमोल इढोले, शेतकरी अजित घाडी, संदीप घाडी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ही पाहणी करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातपिकाची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीचे स्वरूप तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही पिकाच्या नुकसानीची माहिती घेतली.

शिरगाव, साळशी, सांडवे, कुवळे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाच्या नुकसानीची योग्य प्रकारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही लोकप्रतिनिधींनी यावेळी दिली.

शासन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. पाहणीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.