आरोंदा हायस्कूलचा रेखाकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के

Edited by: विनायक गांवस
Published on: January 22, 2026 22:22 PM
views 9  views

सावंतवाडी : आरोंदा हायस्कूलचा सन २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेला  प्रशालेतून एकूण २६ विद्यार्थी बसले होते.

एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतव ( A) श्रेणीत एक (B )श्रेणी दोन तर (C)श्रेणीत दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिजीएट  परीक्षेत या प्रशालेचे (A)श्रेणीत दोन (B) श्रेणीत सात (C)श्रेणी चार विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक चंदन गोसावी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ , अध्यक्ष संदेश परब व प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे संस्था सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.