
कुडाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने भारताच्या संविधान उद्देशिकेच्या प्रत वाटप शुभारंभ करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती सर्वत्र उत्साहाने आणि वैचारिक कार्यक्रमाने संपन्न झाली कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला स्थानिक नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिले तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी सभापती मिलिंद नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते काका कुडाळकर, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, निलेश परब, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, ज्योती जळवी, माजी नगरसेविका सरोज जाधव, नगरपंचायतीचे अधिकारी पठाण उपस्थित होते कुडाळ नगरपंचायतीमार्फत हर घर संविधान कार्यक्रमांतर्गत संविधान उद्देशिका प्रत शहरातील प्रत्येक घरांना दिली जाणार आहे. या उद्देशिका प्रत वाटप शुभारंभावेळी करण्यात आला तसेच यावेळी शिवसेना, भाजप, उबाठा शिवसेना, शासकीय अधिकारी यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर बंड्या सावंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, रोहित भोगटे तसेच स्थानिक नागरिकांमध्ये मंडळाचे माजी अध्यक्ष विजयकुमार जाधव, लक्ष्मण कुडाळकर, माजी सचिव राजेश कुडाळकर, रजनीकांत कदम, नितेश कुडाळकर, आनंद पेंडुरकर, जनार्दन कुडाळकर, निलेश कुडाळकर, दाजी कुडाळकर, अभय जाधव आदी उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी मानले नगरपंचायतीचे आभार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कुडाळ नगरपंचायतीने मंडप व्यवस्था तसेच सुशोभीकरण केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीचे आभार मानले.
फोटो:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान उद्देशिका प्रत वाटप शुभारंभ करताना मान्यवर











