
दोडामार्ग : भाजपा युवा मोर्चा तालुका चिटणीसपदी लवू नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटन बळकटीसाठी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पराशर जगन्नाथ सावंत यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे घोषणा केली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना संघटनात्मक कार्यात अधिक सक्रिय करण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, नव्याने निवड झालेल्या लवु नाईक यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामुळे तालुक्यातील भाजप युवा मोर्चाला नवे बळ मिळणार असून, आगामी काळात संघटनात्मक कामकाज अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











