
दोडामार्ग : घोटगे ग्रामपंचायत सदस्य व नाट्य कलाकार अजय दळवी ( वय - ३५) यांचे अल्पशा आजाराने गोवा येथे निधन झाले. गावच्या प्रत्येक कामाकत हूरहुरीने सहभाग, प्रत्येकाच्या मदतीला धावणारा तसेच सामाजिक, ऐतीहासिक अनेक नाटकात आपली कला दाखवणारा एक कलाकार आज काळाच्या पडद्या आडा गेला आहे. त्याच्या अचानक जाण्याने सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जातं आहे. त्याच्या पछात आई, बहीण असा परिवार आहे.










