
दोडामार्ग : पंचायत समिती दोडामार्ग, शिक्षण विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत टप्पा-३ चा तालुकास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे. दि. १९ जानेवारी २०२६ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत मूल्यांकन समितीमार्फत शाळांची पाहणी करून हा निकाल निश्चित करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा गटात
प्रथम क्रमांक : जि. प. वि. मंदिर, घोटगेवाडी
द्वितीय क्रमांक : जि. प. प्रा. शाळा आडाळी क्र. १
तृतीय क्रमांक : जि. प. पू. प्र. शिरंगे पूर्ववसन
खाजगी अनुदानित | विनाअनुदानित शाळा गटात
प्रथम क्रमांक : दोडामार्ग इंग्लिश स्कूल, दोडामार्ग (जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र)
प्रथम क्रमांक : एम. आर. नाईक विद्यालय, कोनाळकट्टा
द्वितीय क्रमांक : समाजसेवा हायस्कूल, कोलझर
तृतीय क्रमांक : माध्यमिक विद्यालय, सोनावल
या उपक्रमामुळे शाळांच्या परिसर सुशोभीकरण, स्वच्छता, हरित उपक्रम, विद्यार्थी सहभाग आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीला चालना मिळाल्याचे मत शिक्षण विभागाने व्यक्त केले आहे. विजेत्या शाळांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.










