LIVE UPDATES

जिजाऊ संस्थेमार्फत आरोंदा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 26, 2026 20:17 PM
views 14  views

सावंतवाडी : कोकणातील पाचही जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांहून जास्त काळ शिक्षण,आरोग्य, रोजगार, प्रशिक्षण व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून समाजाभिमुख काम सुरू आहे. अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ  परिवाराचे सदस्य अँड.नकुल पार्सेकर यांच्या प्रयत्नातून दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील काही ग्रामीण शाळांमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला असून गेल्यावर्षी या दोन्ही तालुक्यात सुमारे तीस हजारांहून जास्त वह्यांचे वाटप करण्यात आले होते.

यावर्षीही हा उपक्रम काही निवडक शाळांमध्ये राबवण्यात येत आहे.त्या अनुषंगाने आरोंदा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अँड.नकुल पार्सेकर यानी सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे याच्या सामाजिक कामाचा आढावा घेऊन भविष्यात जिल्ह्यात जिजाऊ संस्थेमार्फत काही समाजाभिमुख उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह व आरोंदा गावचे सुपूञ रघुनाथ तानावडे, आरोंदा शिक्षण संस्थेचे कार्यवाह भाई देऊलकर, शाळेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे, सहशिक्षक ताराचंद राठोड, सौ.भावना माजगावंकर, सौ.सुप्रिया कोरगावकर, श्रीकृष्ण गावडे, श्री. वसावे आदि मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. तांबे यानी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. गोसावी यांनी केले.