शिवगर्जना महानाट्याच्या 50, 000 मोफत पासचे जिल्ह्यात वाटप !

विशाल सेवा फाऊंडेशनच्या उपक्रमाकडे राज्याचे लक्ष लागून | महाराष्ट्र, गोव्यातील अनेक नेत्यांची राहणार उपस्थिती
Edited by: भरत केसरकर
Published on: March 13, 2023 09:14 AM
views 162  views

कुडाळ : कुडाळ येथे भारतीय जनता पक्ष आणि विशाल सेवा फाउंडेशन च्या वतीने 17 मार्चला होणाऱ्या शिवगर्जना या नाट्यप्रयोगाची तयारी कुडाळ डेपोच्या मैदानावर जोरदार सुरू आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते राजन तेली यांच्यासह अनेक नेते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत.

     17 मार्चला संध्याकाळी साडेपाच वाजता हा भव्य नाट्य सोहळा होणार आहे. भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग आणि विशाल सेवां फाउंडेशन यांच्यावतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवगर्जना या नाट्यप्रयोगाचा कोकणातला हा पहिला प्रयोग आहे. या नाट्यप्रयोगात सातशे कलाकार सहभागी होणार आहेत. तर हत्ती, घोडे ,उंट बैलगाडी असा लवाजमा थेट रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. तसेच शिवकाळातील अनेक प्रसंग या निमित्ताने भव्य रंगमंचावर दाखवले जाणार आहेत. यात शिवराज्याभिषेक, अफजलखान वध यासह अनेक ऐतिहासिक प्रसंग दाखवले जाणार आहेत.

या नाट्यप्रयोगात काही स्थानिक कलाकारांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. येथे होणाऱ्या नाटकासाठी भव्य  रंगमंचाची तयारी सध्या कुडाळ डेपोच्या मैदानावर सुरू आहे. सुमारे पन्नास हजार प्रेक्षक पहिल्या दिवशी या नाट्यप्रयोगाचा पहा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी मुंबई गोवा महामार्गाच्या पलीकडच्या ग्राउंडवर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तर व्हीआयपी गाड्यांची पार्किंग व्यवस्था कुडाळ डेपोमध्ये करण्यात आले आहे.

    कुडाळ मैदान यासाठी सज्ज झाल आहे. विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब हे स्वतः आणि भाजप ची टीम तसेच विशाल सेवा फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी साठी मेहनत घेत आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता हा नाट्यप्रयोग सुरू होईल. कोकणात एखादा भव्य नाट्यप्रयोग होण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना या नाट्यप्रयोगाची उत्कंठा लागून राहिली आहे. 17 आणि 18 मार्च असे दोन दिवस हा नाट्यप्रयोग होणार असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख प्रवेशिका सध्या वितरित करण्यात आले आहेत. ज्यांना प्रवेशिका हव्या असतील त्यांनी भाजप कार्यालयात तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांकडे संपर्क साधावा तसेच विशाल सेवा फाउंडेशनच्या सावंतवाडीतील कार्यालयातही प्रवेशिका उपलब्ध आहेत अशी माहिती विशाल परब यांनी दिली आहे.

  

नाटकासाठी उभारला जातोय भव्य रंगमंच 


शिवगर्जना हे नाटक प्रत्येक नागरिकांना पहावे असे हे नाट्य आहे. या नाटकात शिवजन्म त्याचबरोबर शिवराज्याभिषेक त्याचबरोबर बाराव्या शतकापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत सर्व प्रयोग दाखवले जाणार आहेत.  पाच मजली भव्य असा फिरता रंगमंच असणार आहे. या रंगमंचाची लांबी 160 फूट तर रुंदी ८९ फूट इतकी भव्य असणार आहे. प्रकाशयोजना, तसेच फिरता रंगमंच, पाच मजली भव्य रंगमंच अशी या नाटकाची वैशिष्ट्य राहणार आहेत. हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी हजारो रुपयांचे तिकीट द्यावे लागतं. तोच नाट्यप्रयोग मोफत दाखवल जाणार आहे. या नाट्यप्रयोगाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी केले आहे.


निलेश राणे यांचा वाढदिवस होणार मोठ्या थाटामाटात साजरा 


विशाल सेवक फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावतीने आयोजित करण्यात नाट्यप्रयोगाच्या आधी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते निलेश राणे यांचा वाढदिवस सोहळा साजरा होणार आहे. या वाढदिवस सोहळ्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार नितेश राणे यांच्यासह राज्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. निलेश राणे यांचा वाढदिवस ही भव्य दिव्य असा साजरा करण्याचं विशाल सेवा फाउंडेशन भारतीय जनता पक्षाने ठरवला आहे.  त्यामुळे या संपूर्ण सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.