
वैभववाडी : लोरे ते गडमठ रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत या मार्गाला २ कोटींचा निधी मंजूर झाला. या कामामुळे लोरे व गडमठ परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वैभववाडी तालुक्यातील महत्वाचा मार्ग लोरे -गडमठ पुर्णतः खड्डेमय झाला होता. या मार्गाचे नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी केला. त्यांतर मंत्री राणे यांच्या माध्यमातून या मार्गासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले. त्याचे भुमिपुजन आज झाले. यावेळी मंगेश लोके, सिद्धेश रावराणे, रितेश सुतार, लोरे सरपंच विलास नावळे, आचिर्णे सरपंच वासुदेव रावराणे यांच्यासह नाना रावराणे, प्रकाश गव्हाणकर, आदेश रावराणे, छोटू रावराणे, सहदेव मोहीते, नागेश आडके, भालचंद्र रावराणे, भास्कर पांचाळ, लक्ष्मण गोसावी, उन्नती पावले मॅडम, लक्ष्मण सुतार, अशोक पियाळकर, डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरणामुळे दळणवळण सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठी मदत होणार आहे. ग्रामस्थांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत मंत्री नितेश राणे व सर्व संबंधितांचे आभार मानले.













