
वेंगुर्ला : समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील वजराठ पेडणेकरवाडीतील दिव्यांग रमेश पेडणेकर यांना ट्रायसायकल भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे रमेश पेडणेकर यांच्या दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार असून त्यांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.
दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा तसेच सामाजिक व्यवहारासाठी सातत्याने प्रवास करावा लागतो. मात्र आवश्यक साधनसुविधांचा अभाव असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन भाजपा दिव्यांग आघाडीने रमेश पेडणेकर यांना ट्रायसायकल उपलब्ध करून देत त्यांच्या जीवनप्रवासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. ट्रायसायकल मिळाल्यामुळे त्यांना स्वतःची दैनंदिन कामे अधिक सहजतेने करता येणार असून इतरांवरील अवलंबित्वही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने प्रयत्नशील असून, प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी पक्ष कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , ता.चिटणीस नितीन चव्हाण , शक्तिकेंद्र प्रमुख नितीन परब , मा.सरपंच सूर्यकांत परब , जेष्ठ कार्यकर्ते वसंत परब , विजय पेडणेकर, दिगंबर पेडणेकर , श्यामसुंदर पेडणेकर , हरी पेडणेकर , रवींद्र पेडणेकर , गुंडू पेडणेकर , विलास पेडणेकर , भूषण पेडणेकर , मकरंद गोंधळेकर , बापू पेडणेकर, अजय पेडणेकर, विकास पेडणेकर, दादा पेडणेकर, समीर कांदे, गोपाळ कांदे,मारुती पेडणेकर, विनायक पेडणेकर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भाजपा दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ तसेच रमेश पेडणेकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि मदतीचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने भाजपा दिव्यांग आघाडी सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशाच स्वरूपाचे उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यात येतील, असा विश्वास भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी यावेळी व्यक्त केला .











