
देवगड : देवगड तालुक्यातील किंजवडे येथील आदर्श विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. किंजवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर किंजवडे देवगड या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी किंजवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर किंजवडे या प्रशालेचे प्रशालेतील सन २००७-०८ च्या १० वी च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेची गरज ओळखून शाळेसाठी रु. १५०००/- चे आर्थिक साहाय्य केले.त्यांच्या या दातृत्वाने शाळेसाठी आवश्यक असणारा इंटरऍक्टिव्ह डिजिटल बोर्डची गरज भागणार असून माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या या कृतीतून दाखवलेली शाळेप्रती असणारी निष्ठा प्रेरणादायी ठरणार आहे.तसेच दाखवलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे. शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी हि भेट एक मोठी मदत ठरेल.
असा विश्वास यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय राठोड सर यांनी व्यक्त केला.यावेळी विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. शाळेसाठी केलेल्या या योगदानाबद्दल सर्व संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थ्यांचं अभिनंदन देखील करण्यात आल.











