
देवगड : अललिनोच्या पार्श्वभूमिवर भविष्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. हे संकट अधिक तिव्र होवू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा वासीयांना लोकसहभागातून वनराई व कच्चे बंधारे उभारण्याचे आवाहन केले आहे. याच आवाहनाला दाभोळे बौध्दवाडी वासीयांनी प्रतिसाद देत दाभोळे गावातील ओढयावर पाणी अडवण्यासाठी कच्चा वनराई बंधारा उभारुन संभाव्य पाणी टचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी हातभर लावला आहे.
पावसाचे पाणी अडविणे, पाणीसाठा निर्माण करणे आणि भूजल पुनर्भरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. कामापूर्वी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून बंधाऱ्यांसाठी योग्य जागेची निवड करण्यात आली. दाभोळे बौध्दवाडीतील पोलीस पाटील सानिका कदम,ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता कदम, वाडीतील ग्रामस्थ हेमत कदम,दिलीप जाधव,रमाकांत कदम, संतोष कदम, राज कदम व महिला ग्रमास्थांनी स्वयंप्रेरणेन श्रमदानातून प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला असून आहे. या बंधा-यामुळे पाणी अडविले जाऊन जमिनीत पाणी मुरण्यास मदत होईल. त्यामुळे विहिरी व अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास तसेच भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत होणार आहे.










