
देवगड : रक्तदान हे सर्वोत्तम दान असून प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, रक्तदान शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचविण्यास मदत होते. अस प्रतिपादन रक्तदान शिबिर कार्यक्रमा निमित्त माजी आमदार अजित गोगटे यांनी केले. देवगड येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
या कार्यक्रमास सभापती गणेश राणे, बाळ खडपे, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, प्रियंका साळसकर, महिला तालुकाध्यक्ष उषःकाल केळुस्कर, राजेंद्र वालकर, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, रोहन खेडेकर, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, भाजप शहराध्यक्ष वैभव करगुटकर, सुभाष धुरी, संजय तारकर, ज्ञानेश्वर खवळे, उल्हास मंचेकर, व्ही.सी. खडपकर ,पंकज दुखंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ.गोगटे पुढेम्हणाले भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजोपयोगी व लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात असून भविष्यातही असे उपक्रम सुरू राहतील,असे यावेळी बोलताना प्रतिपादन केले.










