LIVE UPDATES

अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त २०१ वृक्षांचं वृक्षारोपण

पाच वर्षे संगोपनाचा अनंत पिळणकर यांचा संकल्प
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 17:22 PM
views 39  views

कणकवली :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीनकुर्ली येथे २०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या सर्व २०१ वृक्षांचे पुढील पाच वर्षे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प जाहीर केला. पर्यावरण संवर्धनासाठी ही जबाबदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. अमित सामंत हे जिल्ह्याचे लाडके नेतृत्व व अनेक कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असल्याचे सांगत त्यांच्या निरोगी, सुखी व दीर्घायुष्यासाठी आई कुर्लादेवी व आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) युवक जिल्हा उपाध्यक्ष नयन गावडे, कणकवली उपतालुकाप्रमुख महेश चव्हाण, फोंडा जिल्हा परिषद विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख निलेश राणे, विशाल राणे, उत्तम तेली, रवींद्र गावडे, अमित लाड, तुषार पिळणकर, प्रकाश पिळणकर तसेच कणकवली तालुक्यातील  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.