LIVE UPDATES

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप

नगरसेविका तन्वी चांदोस्कर व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांच आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: June 20, 2026 19:51 PM
views 22  views

देवगड : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देवगड-जामसंडे परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात प्रोत्साहन मिळावे आणि शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची मदत व्हावी या उद्देशाने ५०० शालेय बॅगचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर आणि माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला असून परिसरातील विद्यार्थी आणि पालकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ वाजता देवगड-जामसंडे सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या बॅग वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्राला हातभार लावण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. शैक्षणिक साहित्याची वाढती किंमत लक्षात घेता गरजू व सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.