देवानंद खवणेकर यांची शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: January 05, 2026 19:42 PM
views 39  views

सावंतवाडी : शिवसेना सावंतवाडी मतदारसंघाच्या उपजिल्हा संघटकपदी देवानंद काशिनाथ खवणेकर यांची निवड आज जाहीर करण्यात आली. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. 

या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देवानंद खवणेकर यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र बांधण्याची जबाबदारी खवणेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख सुधा कवठणकर, नितीन गावडे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. खवणेकर यांच्या निवडीमुळे सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.