
मुंबई : फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीतील कंपनी आणि महारत्न दर्जा प्राप्त सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने महाराष्ट्रभर इंधनाचा अखंड आणि सुरळीत पुरवठा सुरू ठेवला आहे. मजबूत पुरवठा साखळी, एकात्मिक वाहतूक व्यवस्था आणि राज्यभर पसरलेल्या विस्तृत रिटेल नेटवर्कच्या माध्यमातून बीपीसीएल शहरी, औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रांमध्ये सातत्याने सेवा देत आहे.
महाराष्ट्रात आर्थिक हालचालींना वेग आला असून वाहतूक, उद्योग आणि अनेक जिल्ह्यांतील पर्यटन क्षेत्रातही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत बीपीसीएलने पेट्रोल (मोटर स्पिरिट), डिझेल (हाय-स्पीड डिझेल) आणि एलपीजीचा सुरळीत व अखंड पुरवठा कायम राखला आहे. त्यामुळे ग्राहक, व्यावसायिक, वाहतूकदार, शेतकरी आणि उद्योगांना इंधनाचा विश्वसनीय पुरवठा सहज उपलब्ध होत आहे.
राज्यातील वाढत्या इंधन मागणीचे चित्र बीपीसीएलच्या विक्री आकडेवारीतही दिसून येते. मे 2026 मध्ये महाराष्ट्रातील बीपीसीएलच्या पेट्रोल विक्रीने 1,38,500 मेट्रिक टनांचा टप्पा ओलांडला. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री 1,29,320 मेट्रिक टन होती. यामध्ये 7.1 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, डिझेल विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मे 2026 मध्ये डिझेलची विक्री 3,24,900 मेट्रिक टनांपेक्षा अधिक झाली, तर मे 2025 मध्ये ती 2,85,370 मेट्रिक टन होती. यामुळे डिझेल विक्रीत 13.9 टक्के मजबूत वाढ नोंदवली गेली आहे.
इंधनाच्या वाढत्या वापरातून महाराष्ट्रातील आर्थिक हालचाली सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. प्रवासी वाहतुकीत वाढ, व्यावसायिक मालवाहतूक, पायाभूत सुविधा विकास, औद्योगिक कामकाज, कृषी क्षेत्रातील कामकाज आणि राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमधील पर्यटनाला मिळालेली चालना यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे.
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही इंधनाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल विक्री 4,100 मेट्रिक टनांपेक्षा अधिक झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 1.5 टक्के वाढ झाली आहे. तसेच डिझेल विक्री 3,430 मेट्रिक टनांपेक्षा अधिक झाली असून, त्यात 5.8 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
बीपीसीएल मुंबईतील लाखो एलपीजी ग्राहकांनाही सातत्याने सेवा देत आहे. कंपनीने 7 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरवठा केला असून, त्यासोबतच व्यावसायिक आणि मोठ्या प्रमाणातील एलपीजीचाही पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे शहरातील घरे, व्यावसायिक आस्थापने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उद्योगांना आवश्यक इंधन उपलब्ध झाले आहे.
महाराष्ट्रातील अनेक प्रादेशिक बाजारपेठांमध्येही इंधन वापरात चांगली वाढ नोंदवली गेली आहे. राज्यातील मजबूत आर्थिक हालचाली, पायाभूत सुविधा विकास, पर्यटन, शेती क्षेत्रातील वाढते कामकाज आणि वाढती वाहतूक यामुळे इंधनाची मागणी वाढत असल्याचे यावरून दिसून येते.
सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक ठरला आहे. मे 2026 मध्ये पेट्रोल विक्री 1,688.52 मेट्रिक टन झाली, तर गेल्या वर्षी ती 1,385.19 मेट्रिक टन होती. यामध्ये 21.90 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. डिझेल विक्री 1,807.85 मेट्रिक टनांवरून 2,376.45 मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, त्यात 31.45 टक्के मजबूत वाढ झाली आहे. मे महिन्यात बीपीसीएलने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 37,512 घरगुती एलपीजी सिलिंडर आणि 2,128 व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा केला. कोकण विभागातील वाढत्या पर्यटन आणि आर्थिक हालचालींमुळे ही मागणी वाढली आहे.
पुणे विभागात मे 2026 मध्ये पेट्रोलची (एमएस) विक्री 22,151.45 मेट्रिक टन झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही विक्री 20,202.96 मेट्रिक टन होती. यामध्ये 9.64 टक्के वाढ नोंदवली गेली. डिझेल (एचएसडी) विक्री 31,362.27 मेट्रिक टनांवरून 36,297.16 मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, त्यात 15.74 टक्के वाढ झाली आहे. बीपीसीएलने पुणे विभागात 9,07,488 घरगुती एलपीजी सिलिंडर, 41,215 व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि 3,528 एफटीएल सिलिंडरचा पुरवठा केला आहे. यावरून पुण्यातील निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये एलपीजीची मजबूत मागणी असल्याचे दिसून येते.
नागपूर विभागात पेट्रोलची विक्री 8,772.13 मेट्रिक टन झाली, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ती 8,108.09 मेट्रिक टन होती. यामध्ये 8.19 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. डिझेल विक्री 21,056.86 मेट्रिक टनांवरून 23,862.79 मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, त्यात 13.33 टक्के वाढ झाली आहे. मे महिन्यात बीपीसीएलने 1,47,677 घरगुती एलपीजी सिलिंडर, 2,068 व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि 1,536 एफटीएल सिलिंडरचा पुरवठा केला. यावरून नागपूरचे लॉजिस्टिक्स आणि व्यावसायिक केंद्र म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित होते.
नाशिक हे राज्यातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक ठरले आहे. मे 2026 मध्ये नाशिकमध्ये पेट्रोल विक्री 9,742.11 मेट्रिक टन झाली, तर गेल्या वर्षी ती 8,319.09 मेट्रिक टन होती. यामध्ये 17.13 टक्के वाढ झाली आहे. डिझेल विक्री 19,203.72 मेट्रिक टनांवरून 24,867.60 मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, त्यात तब्बल 29.49 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मे 2026 दरम्यान बीपीसीएलने नाशिक विभागात 4,46,031 घरगुती एलपीजी सिलिंडर, 12,726 व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि 3,281 एफटीएल सिलिंडरचा पुरवठा केला.
कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पेट्रोल विक्री 6,192.77 मेट्रिक टन झाली, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ती 5,619.42 मेट्रिक टन होती. यामध्ये 10.20 टक्के वाढ नोंदवली गेली. डिझेल विक्री 7,701.65 मेट्रिक टनांवरून 9,438.02 मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, त्यात 22.55 टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात 2,48,861 घरगुती एलपीजी सिलिंडर, 4,569 व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि 177 एफटीएल सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला.
सांगली जिल्ह्यात यावर्षी पेट्रोल विक्री 3,793.06 मेट्रिक टन झाली, तर गेल्या वर्षी ती 3,403.61 मेट्रिक टन होती. यामध्ये 11.44 टक्के वाढ झाली आहे. डिझेल विक्री 5,819.42 मेट्रिक टनांवरून 6,775.21 मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, त्यात 16.42 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मे 2026 दरम्यान बीपीसीएलने सांगली जिल्ह्यात 1,52,484 घरगुती एलपीजी सिलिंडर, 3,585 व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि 558 एफटीएल सिलिंडरचा पुरवठा केला.
सातारा जिल्ह्यात यावर्षी पेट्रोल विक्री 4,469.88 मेट्रिक टन झाली, तर गेल्या वर्षी ती 4,115.52 मेट्रिक टन होती. यामध्ये 8.61 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. डिझेल विक्री 6,997.52 मेट्रिक टनांवरून 8,498.35 मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, त्यात 21.45 टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात जिल्ह्यात 2,21,460 घरगुती एलपीजी सिलिंडर, 3,176 व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि 513 एफटीएल सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी पेट्रोल विक्री 2,154.86 मेट्रिक टन झाली, तर गेल्या वर्षी ती 1,881.64 मेट्रिक टन होती. यामध्ये 14.52 टक्के वाढ झाली आहे. डिझेल विक्री 3,539.67 मेट्रिक टनांवरून 3,898.76 मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, त्यात 10.14 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मे 2026 मध्ये बीपीसीएलने रत्नागिरी जिल्ह्यात 33,637 घरगुती एलपीजी सिलिंडर आणि 1,423 व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा केला.
या कामगिरीबाबत प्रतिक्रिया देताना बीपीसीएलच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “महाराष्ट्रभर ग्राहकांना इंधनाचा विश्वासार्ह आणि अखंड पुरवठा मिळावा यासाठी बीपीसीएल कटिबद्ध आहे. आमची मजबूत पुरवठा साखळी, वाहतूक व्यवस्था आणि विस्तृत रिटेल नेटवर्क यांच्या माध्यमातून आम्ही ग्राहक, व्यवसाय, उद्योग, शेतकरी आणि वाहतूकदार यांच्या वाढत्या ऊर्जा गरजा प्रभावीपणे पूर्ण करत आहोत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून आलेली मजबूत वाढ ही महाराष्ट्रातील मजबूत आर्थिक घडामोडी, पायाभूत सुविधा विकास आणि वाढत्या वाहतुकीचे प्रतीक आहे. आम्ही पुढेही मागणीवर बारकाईने लक्ष ठेवून संपूर्ण राज्यात अखंड ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित करत राहू.”
महाराष्ट्रातील बीपीसीएलचे सर्व पेट्रोल पंप सध्या नियमितपणे कार्यरत असून, त्यांच्याकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कार्यक्षम पुरवठा व्यवस्था, नियमित साठा भरून काढणे आणि समन्वयित वाहतूक व्यवस्थेमुळे इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.
ग्राहक सेवा, कार्यक्षम कामकाज आणि सर्वांसाठी ऊर्जा सहज उपलब्ध करून देण्यावर भर देत, बीपीसीएल महाराष्ट्राच्या विकासाला चालना देत आहे. राज्यातील लाखो ग्राहकांना दररोज विश्वासार्ह आणि अखंड ऊर्जा सेवा उपलब्ध करून देण्याचे काम कंपनी सातत्याने करत आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) विषयी फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीतील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची तेल विपणन कंपनी असून देशातील प्रमुख एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी कच्च्या तेलाचे शुद्धीकरण (रिफायनिंग) आणि पेट्रोलियम उत्पादनांची विक्री करते. तसेच तेल आणि वायू उद्योगाच्या अपस्ट्रीम व डाउनस्ट्रीम क्षेत्रांमध्येही कंपनीची उपस्थिती आहे. बीपीसीएलला ‘महारत्न’ दर्जा प्राप्त झाला असून त्यामुळे कंपनीला अधिक स्वायत्तपणे (स्वतंत्रपणे) कामकाज आणि आर्थिक निर्णय घेण्याची मोठी मुभा मिळाली आहे.
बीपीसीएलच्या मुंबई, कोची आणि बीना येथील रिफायनरीजची एकत्रित शुद्धीकरण क्षमता सुमारे 35.3 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष (MMTPA) आहे. कंपनीकडे इंधन साठवण केंद्रे, डेपो, पेट्रोल पंप, विमान इंधन सेवा केंद्रे आणि एलपीजी वितरकांचे विस्तृत जाळे आहे. कंपनीच्या वितरण नेटवर्कमध्ये 25,300 हून अधिक पेट्रोल पंप, 1,000 हून अधिक सीएनजी स्टेशन, 6,250 हून अधिक एलपीजी वितरक, 440 हून अधिक ल्युब्रिकंट वितरक, 81 पेट्रोलियम साठवण केंद्रे, 56 एलपीजी बॉटलिंग प्लांट्स, 81 विमान इंधन सेवा केंद्रे, 5 ल्युब्रिकंट ब्लेंडिंग प्लांट्स आणि 6 आंतरराज्य पाइपलाइन यांचा समावेश आहे.
शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी बीपीसीएल आपल्या व्यवसाय धोरणांमध्ये गुंतवणूक, पर्यावरणीय आणि सामाजिक उद्दिष्टांचा समावेश करत आहे. कंपनीने देशभरातील 6,800 हून अधिक पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. हरित आणि शाश्वत ऊर्जेला प्राधान्य देत, बीपीसीएलने 2040 पर्यंत ‘नेट झिरो एनर्जी कंपनी’ बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी कंपनी स्कोप-1 आणि स्कोप-2 उत्सर्जन कमी करण्यावर भर देत आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून बीपीसीएल शिक्षण, जलसंधारण, कौशल्य विकास, आरोग्य, समुदाय विकास, क्षमता वाढ आणि कर्मचारी स्वयंसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक उपक्रम राबवत आहे. ‘एनर्जायझिंग लाइव्ह्ज’ हे कंपनीचे मुख्य ध्येय असून, प्रतिभा, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या बळावर जागतिक स्तरावर आदरणीय ऊर्जा कंपनी बनण्याचे बीपीसीएलचे उद्दिष्ट आहे.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:
रमण मलिक
हेड (पीआर व ब्रँड)
ईमेल: malikr@bharatpetroleum.in
फोन: +91 22 22713340
सौरभ जैन
डेप्युटी जनरल मॅनेजर (पीआर व ब्रँड)
ईमेल: jains4512@bharatpetroleum.in
फोन: +91 9895095210












